आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; १२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; १२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
लेवाजगत न्यूज वर्धा, दि. २८ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा जिल्ह्यात २२२ आपले सरकार सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक अर्जदारांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
इच्छुकांनी Wardha.Gov.in Wardha.Gov.inया संकेतस्थळावरील aaplesarkarwardha.gt.tc या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करावेत. सेवा केंद्रांसाठीच्या अटी व शर्ती, तसेच रिक्त केंद्रांची यादीही जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यापूर्वी जुन्या लिंकद्वारे अर्ज केलेल्या उमेदवारांनाही नवीन लिंकवरून पुन्हा अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत