Contact Banner

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३०च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रतिनिधित्व

 

godavari-college-of-nursing-represents-at-rotaract-district-3030-yogparv-2026-installation-ceremony

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३०च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रतिनिधित्व

जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० आयोजित ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभात उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. हा समारंभ दि. २६ जुलै २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील साताना येथील सूर्या लॉन्स, तरहाबाद रोड येथे उत्साहात पार पडला.


रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३०च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रतिनिधित्व




या समारंभात महाविद्यालयाच्या जान्हवी सोनवणे, रोशनी भाट, क्रिस्टिना डी’सूझा आणि अविनाश डोईफोडे यांनी प्रा. निलेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत महाविद्यालयाचा गौरव वाढविला.

कार्यक्रमात रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३०च्या नव्या नेतृत्वाची स्थापना करण्यात आली. नेतृत्व विकास, मैत्रीभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि निःस्वार्थ सेवेच्या मूल्यांना अधोरेखित करणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहभागातून नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि संघभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, प्राचार्यांनी तसेच प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करत भविष्यातही अशाच सामाजिक व नेतृत्वविकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.