Contact Banner

"केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने -भुसावळहून विशेष आषाढी रेल्वे रवाना! वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे"

 



"भुसावळहून विशेष आषाढी रेल्वे रवाना! 
वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे"

लेवाजगत न्यूज भुसावळ : आषाढी एकादशीनिमित्त जळगाव, बुलडाणा व परिसरातील हजारो वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्थानकावरून अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीने पंढरपूरकडे रवाना झाले. गाडीला केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवत वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

केंद्रीय राज्य मंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष रेल्वेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २४ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळहून ही विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली. वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ही विशेष रेल्वे २५ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार असून, त्याच दिवशी रात्री १०.३० वाजता परतीचा प्रवास सुरू करणार आहे. २६ जुलै रोजी ही रेल्वे पुन्हा भुसावळ येथे दाखल होईल.




या विशेष रेल्वेसाठी आवश्यक जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली असून, वारकऱ्यांना ही सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.