Contact Banner

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात 'भव्य आरोग्य संपदा शिबिर' सुरू २१ जुलै ते ३० ऑगस्टदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार व विविध वैद्यकीय सेवांवर विशेष सवलती

dr-ulhas-patil-hospital-launches-bhavya-aarogya-sampada-health-camp-jalgaon


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात 'भव्य आरोग्य संपदा शिबिर' सुरू

२१ जुलै ते ३० ऑगस्टदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार व विविध वैद्यकीय सेवांवर विशेष सवलती

जळगाव | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस, आषाढी एकादशी आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथे 'भव्य आरोग्य संपदा शिबिर' सुरू करण्यात आले आहे. हे शिबिर २१ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिकांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. डॉ. युवराज बढे (छाती व फुफ्फुसरोग तज्ज्ञ) आणि डॉ. रोशन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड, किडनी व लिव्हरचे आजार, दमा, श्वसनाचे विकार, क्षयरोग (टीबी), सीओपीडी तसेच इतर विविध आजारांवर निदान व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शिबिरादरम्यान आवश्यकतेनुसार डायलिसिस, ब्राँकोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, 2D इको कार्डिओग्राफी, ऑक्सिजन, नेब्युलायझेशन, आयसीयू, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध राहणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी २४ तास तातडीची वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांनी आयुष्मान कार्ड सोबत आणावे. कार्ड उपलब्ध नसल्यास मूळ रेशन कार्ड व आधार कार्ड आणणे आवश्यक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय, शासनाच्या योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारांवरील उपचारही शिबिरादरम्यान सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आवश्यक तपासण्या, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठीही विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या असून, या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.