बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू; एमएचटी-सीईटी, जेईई व नीट विद्यार्थ्यांना संधी
बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू; एमएचटी-सीईटी, जेईई व नीट विद्यार्थ्यांना संधी
जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात एमएचटी-सीईटी, जेईई आणि नीट परीक्षा दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उपलब्ध असून कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
कृषी क्षेत्रात संशोधन, कृषी अधिकारी, कृषी सल्लागार, अॅग्री-बिझनेस, बँकिंग, कृषी उद्योग तसेच उच्च शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध असल्यामुळे बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी भक्कम करिअरचा पाया ठरत आहे.
महाविद्यालयाचा कोड क्रमांक १११३७ असून आधुनिक शेती तंत्रज्ञान, संशोधनाधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम कृषी पदवीधर घडविण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शैक्षणिक व प्रात्यक्षिक सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहेत.
संस्थापक-अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महाविद्यालयाने उत्तर महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण कृषी शिक्षणाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू असून पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.
प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी डॉ. शैलेश तायडे यांच्याशी ९७१४९ ४७१३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत