Contact Banner

फैजपूर नगरपरिषदेतील रिक्त पदे तातडीने भरा; नगराध्यक्षा दामिनी सराफ यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

 

faizpur-municipal-council-vacant-posts-demand-damini-saraf-to-divisional-commissioner

फैजपूर नगरपरिषदेतील रिक्त पदे तातडीने भरा; नगराध्यक्षा दामिनी सराफ यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

faizpur-municipal-council-vacant-posts-demand-damini-saraf-to-divisional-commissioner





फैजपूर (लेवजगत न्यूज प्रतिनिधी): फैजपूर नगरपरिषदेतील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे तातडीने भरून प्रशासन अधिक सक्षम करण्याची मागणी नगराध्यक्षा दामिनी सराफ यांनी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी फैजपूर येथील उपविभागीय कार्यालयाला भेट दिली असता नगराध्यक्षा दामिनी सराफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी नगरपरिषदेतील विविध विभागांमध्ये अनेक पदे रिक्त असल्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामकाजासह विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

नगरपरिषदेतील रिक्त पदे तातडीने भरल्यास नागरिकांना अधिक दर्जेदार, जलद व परिणामकारक सेवा उपलब्ध होतील. तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा, बांधकाम, कर वसुली आणि इतर महत्त्वाच्या विभागांचे कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडण्यास मदत होईल. त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पदभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी नगराध्यक्षा दामिनी सराफ यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, प्रांताधिकारी बबनराव काकडे, तसेच नगरसेवक पवन सराफ, राहुल गुजराथी आणि सुरज गाजरे उपस्थित होते.

नगरपरिषदेतील रिक्त पदे भरल्यास शहरातील विकासकामांना गती मिळेल आणि नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत नागरी सेवांच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास नगराध्यक्षा दामिनी सराफ यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.