'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत नशिराबादमध्ये आरोग्य जनजागृती रॅली व आरोग्य शिबिर उत्साहात
'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत नशिराबादमध्ये आरोग्य जनजागृती रॅली व आरोग्य शिबिर उत्साहात
नशिराबाद लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :
'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत नशिराबाद येथे आयुष्मान आरोग्य मंदिर व नगरपरिषद नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांविषयी जनजागृती आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमन पटेल व डॉ. स्नेहा कोलते यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात आले.
या अभियानात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती रॅली काढून नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी जनजागृती, HPV लसीकरणाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. गरोदर मातांची रक्त तपासणी करून आरोग्य तपासणीही करण्यात आली.
संपूर्ण गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली असून नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमात आरोग्य सहाय्यक लुकामान तडवी, आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, दीपक तायडे, संदेश महाजन, अरविंद गाढे, वासुदेव पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय सपकाळे व नीलिमा येलगिरे, आरोग्य सेविका सुवार्ता ढालवाले, बफी साळुंके, हसरा तडवी तसेच आशा सेविकांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत