१५ जुलैला जळगावात भव्य रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रात २०७+ रिक्त पदांची सुवर्णसंधी
१५ जुलैला जळगावात भव्य रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रात २०७+ रिक्त पदांची सुवर्णसंधी
जळगाव | प्रतिनिधी
जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत जळगाव येथे १५ जुलै २०२६ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जळगाव तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा सकाळी १० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे.
या मेळाव्यात विशेषतः इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नोकरी इच्छुकांसाठी २०७ हून अधिक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. जैन इरिगेशन, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स, छबी इलेक्ट्रिकल्स, रेमंड, लिग्रँड, अॅस्टीमो, एडीको (पुणे) तसेच आकाशवाणी, जळगाव अशा विविध नामांकित संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी आयटीआय, डिप्लोमा, बी.ई., बी.टेक., बी.एस्सी., पदवीधर, इंजिनिअरिंग असिस्टंट तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.
इच्छुक उमेदवारांनी रोजगार पोर्टलवर https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index नोंदणी करून संबंधित पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा. ज्यांची नोंदणी झालेली नाही, त्यांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि बायोडाटा सोबत घेऊन मुलाखतीच्या दिवशी थेट रोजगार मेळाव्यात उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता) संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत