Contact Banner

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया


mahadev-hospital-organises-spine-disorders-camp-free-surgeries-under-pmjay-and-mjpjay



महादेव हॉस्पिटलतर्फे  पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया

लेवाजगत न्यूज जळगाव — येथील महादेव हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्याशी संबंधित गंभीर आजारांवरील उपचार आता प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांसाठी कॅशलेस पद्धतीने उपलब्ध आहेत. 






या योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाठीच्या कण्यावरील विविध शस्त्रक्रियांचा लाभ मिळू शकतो.रुग्णालयात मणक्याचे झीजणे (स्पाँन्डेलायसिस), हर्निएटेड डिस्क (स्लिप डिस्क/चिमटलेली नस), स्पायनल स्टेनोसिस, स्कोलिओसिस (मणक्याची वक्रता), कंबरदुखी पायात पसरणे (सायटीका) यांसारख्या आजारांवर अनुभवी अस्थिरोग तज्ज्ञांकडून तपासणी व उपचार केले जातात.अचूक निदानासाठी एमआरआय तपासणी केवळ ४,००० या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे  यामुळे रुग्णांना वेळेवर निदान करून योग्य उपचार सुरू करणे अधिक सुलभ होत आहे.महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. प्रमोद सारकेलवाड आणि डॉ. विरेंद्र पाटील हे अनुभवी अस्थिरोग शल्यचिकित्सक सेवा देत असून, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आधुनिक निदान सुविधा आणि तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.रुग्णालय प्रशासनाने पाठीच्या कण्याशी संबंधित त्रास असलेल्या नागरिकांनी उपचार पुढे न ढकलता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व पात्र लाभार्थ्यांनी शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क :महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव ०२५७-२२३१००७ योजना समन्वयक : डॉ. देवेंद्र पाटील — ७७९६१ ९०२९९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.