Contact Banner

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डिव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी मुंबईतील बालहृदयरोगतज्ज्ञांच्या सहकार्याने कॅथलॅबमध्ये चिरफाडविरहित उपचार; दोन बालकांना मिळाले नवजीवन

 

mahadev-hospital-successful-device-closure-surgery-for-congenital-heart-defect-in-jalgaon

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डिव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबईतील बालहृदयरोगतज्ज्ञांच्या सहकार्याने कॅथलॅबमध्ये चिरफाडविरहित उपचार; दोन बालकांना मिळाले नवजीवन

जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी

जळगाव येथील महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्र (एएसडी/पीडीए/व्हीएसडी प्रकारातील योग्य रुग्णांमध्ये) अत्याधुनिक डिव्हाईस क्लोजर पद्धतीने यशस्वीरित्या बंद करण्यात आले. डॉ. वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील बालहृदयरोगतज्ज्ञांच्या सहकार्याने कॅथलॅबमध्ये चिरफाडविरहित ही शस्त्रक्रिया पार पडली.






महादेव हॉस्पिटलच्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये करण्यात आलेल्या या प्रक्रियेत रुग्णाच्या शरीरावर कोणतीही मोठी चिरफाड न करता रक्तवाहिनीद्वारे विशेष डिव्हाईस हृदयात बसवून छिद्र बंद करण्यात आले. त्यामुळे रक्तस्राव कमी होतो, रुग्ण लवकर बरा होतो आणि अल्पावधीत घरी परतू शकतो.

या शस्त्रक्रियेसाठी महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी) यांच्या नेतृत्वाखाली अपोलो हॉस्पिटल, मुंबई येथील पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. भूषण चौहानडॉ. धवल खडके, तसेच डॉ. झीशान सय्यद (कार्डिओलॉजी निवासी वैद्यकीय अधिकारी) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कॅथलॅब टेक्निशियन मोहम्मद सिद्दिकी यांनीही तांत्रिक जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली.

याबाबत बोलताना डॉ. वैभव पाटील म्हणाले की, जन्मजात हृदयातील छिद्राचे वेळेत निदान व उपचार झाल्यास मुलांचे आयुष्य पूर्णपणे निरोगी राहू शकते. आधुनिक डिव्हाईस क्लोजर तंत्रज्ञानामुळे छाती उघडण्याची गरज भासत नाही. त्यामुळे उपचार अधिक सुरक्षित, कमी वेदनादायी आणि जलद पुनर्वसनास सहाय्यक ठरतात.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जळगाव व उत्तर महाराष्ट्रातील बालहृदयरुग्णांना अशा अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबईसारख्या महानगरात जाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, महादेव हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाची पेडियाट्रिक कार्डिओलॉजी सेवा उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.