महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा 24 जुलै रोजी जळगाव जिल्हा दौरा
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा 24 जुलै रोजी जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, दि. 22 (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. कु. आदिती वरदा सुनील तटकरे या शुक्रवार, दि. 24 जुलै 2026 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार कक्षाने प्रसिद्ध केलेल्या दौरा कार्यक्रमानुसार, त्या सायंकाळी 7.05 वाजता पुणे विमानतळावरून FLY 91 IC 5206 या विमानाने जळगावकडे रवाना होतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर वाहनाने शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे पोहोचतील. त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात राखीव असल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत