Contact Banner

हळद पिक विम्यासाठी मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवावी — आमदार अमोल जावळे



 हळद पिक विम्यासाठी मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवावी — आमदार अमोल जावळे 



रावेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी 

हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत हळद पिकासाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढवावी, अशी मागणी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.


राज्य शासनाने प्रथमच हळद पिकाचा विमा योजनेत समावेश केल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र योजनेची माहिती उशिरा मिळणे, ऑनलाइन नोंदणी, फार्मर आयडी, कागदपत्रांची पूर्तता, पिक नोंद आणि कृषी सेवा केंद्रांवरील वाढती गर्दी यामुळे अनेक पात्र शेतकरी निश्चित मुदतीत विमा प्रस्ताव भरू शकत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


त्यामुळे एकही पात्र हळद उत्पादक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवावी, अशी मागणी आमदार जावळे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.