Contact Banner

पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज २४ ऑगस्टपर्यंत; पेट-२०२६चे वेळापत्रक जाहीर

 

phd-pet-2026-application-deadline-24-august-kbcnmu

पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज २४ ऑगस्टपर्यंत; पेट-२०२६चे वेळापत्रक जाहीर

जळगाव | प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधन विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या पेट (PET)-२०२६ प्रवेश परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २४ जुलैपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पीएच.डी. प्रवेशासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, पेट-२०२६साठीचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे नियमानुसार अपलोड करून सर्व माहिती अचूक भरावी. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १७ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवारांच्या लॉगिनवर हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाईल.





पेट-२०२६ प्रवेश परीक्षा २३ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची हार्ड कॉपी १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधित विद्यापीठ विभागाकडे जमा करावी लागणार आहे.

पेट परीक्षेतून सूट मिळणाऱ्या उमेदवारांसाठीची सविस्तर माहिती आणि वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन संशोधन विभागाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.