Contact Banner

खासदार रक्षा खडसे यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांसाठी भुसावळ–पंढरपूर विशेष मोफत आषाढी रेल्वे

 

raksha-khadse-announces-free-bhusawal-pandharpur-ashadhi-special-train-for-warkaris

खासदार रक्षा खडसे यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांसाठी भुसावळ–पंढरपूर विशेष मोफत आषाढी रेल्वे

भुसावळ प्रतिनिधी लेवाजगत न्यूज- 

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या जळगाव, बुलढाणा व परिसरातील हजारो वारकरी भाविकांसाठी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या पुढाकारातून यंदाही भुसावळ–पंढरपूर–भुसावळ विशेष अनारक्षित मोफत आषाढी रेल्वे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विशेष रेल्वेमुळे वारकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुरक्षित, सुलभ आणि मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असून वारकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.






विशेष रेल्वे गाडी क्रमांक 01159 ही दि. 24 जुलै 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे रवाना होणार आहे. तर गाडी क्रमांक 01160 ही विशेष रेल्वे दि. 25 जुलै 2026 रोजी रात्री 10.30 वाजता पंढरपूरहून भुसावळकडे परतीच्या प्रवासासाठी सुटणार आहे.

आषाढी वारीसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जात असतात. त्यांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये, तसेच अधिकाधिक भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशाने ही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खासदार रक्षा निखिल खडसे यांनी वारकरी परंपरेचा सन्मान राखत भाविकांच्या सोयीसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल वारकरी बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव, बुलढाणा व परिसरातील वारकऱ्यांनी या मोफत विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष रेल्वेचे वेळापत्रक

  • गाडी क्र. 01159 : भुसावळ – पंढरपूर
    दि. 24 जुलै 2026 | दुपारी 1.30 वा.
  • गाडी क्र. 01160 : पंढरपूर – भुसावळ
    दि. 25 जुलै 2026 | रात्री 10.30 वा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.