Contact Banner

श्री स्वामीनारायण मंदिराच्या सिंहासनाचा मार्बल जीर्णोद्धार सुरू

 

https://www.lewajagat.com/2026/07/savda-swaminarayan-mandir-singhasan-marble-renovation-darshan-timing-change.html


श्री स्वामीनारायण मंदिराच्या सिंहासनाचा मार्बल जीर्णोद्धार सुरू


लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी): सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून सोमवारपासून सिंहासनावर मार्बल बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या कामामुळे मंदिरातील दर्शन व आरतीच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.


कोठारी श्री स्वयंप्रकाशदाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी होणारी राजभोग आरती नेहमीप्रमाणे सकाळी १०.१५ वाजता न होता सकाळी ९.४५ वाजता होईल. तसेच सकाळी ९.१५ वाजता भगवंतांचे दर्शन बंद करण्यात येईल.





याशिवाय, सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्ण देव यांच्या दर्शनासाठी मंदिर बंद राहील.


मंदिरातील जीर्णोद्धाराचे काम सुरळीत पार पडावे, यासाठी सर्व भाविकांनी दर्शन व आरतीच्या बदललेल्या वेळांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन कोठारी श्री स्वयंप्रकाशदाजी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.