Contact Banner

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी 'स्माईल' शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची मदत

 

smile-scholarship-for-transgender-students-rs-13500-annual-assistance

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी 'स्माईल' शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची मदत

जळगाव | लेवा जगत न्यूज : तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयातर्फे 'स्माईल (SMILE)' शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी १३,५०० रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.






या योजनेचा लाभ इयत्ता ९ वी व १० वीच्या प्री-मॅट्रिक विद्यार्थ्यांसह इयत्ता ११ वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर आणि इतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शासनमान्य किंवा खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये नियमित शिक्षण घेणारे भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराकडे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले वैध ट्रान्सजेंडर ओळखपत्र (Identity Certificate) असणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज https://scholarships.gov.in    (NSP) राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन करावा लागणार आहे. लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेनुसार केली जाणार असून, शिष्यवृत्तीची रक्कम थेट डीबीटी (DBT)द्वारे आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल. केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.

पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.