स्वातंत्र्यसेनानी सेंट जोसेफ काका बाप्तिष्ट शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेला उत्साही सुरुवात
स्वातंत्र्यसेनानी सेंट जोसेफ काका बाप्तिष्ट शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेला उत्साही सुरुवात
मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यसेनानी सेंट जोसेफ काका बाप्तिष्ट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेकॅनिक या व्यवसायासाठी प्रवेश घेणारा कुमार किरण मांडवकर हा यंदाचा पहिला प्रशिक्षणार्थी ठरला.
प्रथम प्रवेशित प्रशिक्षणार्थ्याचे संस्थेच्या गटनिदेशिका मितू मिरजकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेतील अधिकारी, निदेशक तसेच कर्मचारीवर्गाने त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने कौशल्याधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. प्रथम प्रवेशित विद्यार्थ्याचा सन्मान करण्यामागील उद्देश इतर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत आकर्षण निर्माण करणे, तसेच आत्मविश्वास आणि जिद्द वाढविणे हा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
किरण मांडवकर याचा पहिला प्रवेश हा नव्या शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात मानली जात असून, त्याच्या या यशस्वी वाटचालीतून अधिकाधिक युवकांनी कौशल्य शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. संस्थेत नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अनुकूल आणि प्रेरणादायी वातावरण तयार करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत