आज रात्रीपासून एसटी प्रवास महाग! प्रवासी भाड्यात १३.५६% वाढ लागू
आज रात्रीपासून एसटी प्रवास महाग! प्रवासी भाड्यात १३.५६% वाढ लागू
डिझेल, सुटे भाग, टायर, देखभाल खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढीमुळे निर्णय; साध्या बसवरील १०% हंगामी भाडेवाढ रद्द.
लेवाजगत न्युज मुंबई :- राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून, ही दरवाढ आज रात्रीपासून लागू होणार आहे.
डिझेलचे वाढलेले दर, वाहनांचे सुटे भाग, टायर व देखभाल खर्चातील वाढ तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी लागू करण्यात आलेली साध्या बससेवेवरील १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, भाडेवाढ निश्चित करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार एसटी सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटी सेवेला सहकार्य व विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत