Contact Banner

आमदार अमोल जावळेंचा अनोखा निर्णय; यावल आगारातील ५ नवीन एसटी बसचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण

 

Amol-Jawale-inaugurates-5-new-ST-buses-at-Yawal-depot-through-senior-citizens

आमदार अमोल जावळेंचा अनोखा निर्णय; यावल आगारातील ५ नवीन एसटी बसचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण

लेवाजगत न्यूज यावल : रावेरनंतर यावल एस.टी. आगारासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या विशेष पाठपुराव्याला यश आले असून, राज्य परिवहन महामंडळाकडून यावल आगारात पाच नवीन एस.टी. बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बससेवेमुळे यावल तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.






या लोकार्पण सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार अमोल जावळे यांनी स्वतः बसचे लोकार्पण न करता यावल शहरातील पाच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नवीन बससेवेचा शुभारंभ केला. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून व विधिवत पूजन करून बससेवेचे लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

ज्येष्ठ नागरिकांना मानाचे स्थान देत त्यांच्या अनुभवाला आणि सामाजिक योगदानाला आदर देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्वतः लोकार्पण करण्याऐवजी ज्येष्ठांच्या हस्ते हा सोहळा पार पाडण्याची आमदार जावळे यांची भूमिका सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारी ठरली.

यावल आगारातील बसची संख्या अपुरी असल्याने काही मार्गांवरील बसफेऱ्या नियमितपणे चालविताना अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी प्रवाशांना अनेकदा गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. आता पाच नवीन बस उपलब्ध झाल्यामुळे बसफेऱ्या अधिक नियमित होण्यास मदत होणार असून, प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित व सुविधाजनक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

यावल आगाराला नवीन बस उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने यावलकरांकडून त्यांचे स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला हिरालाल चौधरी, नारायण चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, हर्षल पाटील, छाया पाटील, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, रवींद्र पाटील, गणेश नेहते, विनोदकुमार पाटील, प्रभाकर अप्पा सोनवणे, आर. जी. पाटील, उमेश फेगडे, नंदा महाजन, दीपक पाटील, पवन सराफ, सिद्धेश्वर वाघुळदे, अतुल पाटील, नितीन सोनार, मुन्ना पाटील, राहुल बारी, अतुल भालेराव, आकाश चोपडे, वर्षा चोपडे, उमेश पाटील, योगीराज बराटे, राकेश फेगडे, राजू काठोके, योगिताताई यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, एस.टी. विभागातील अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच नवीन एस.टी. बसमुळे यावल तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगली, नियमित आणि सोयीची बससेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलेल्या या अनोख्या लोकार्पण सोहळ्यामुळे सामाजिक संदेशही प्रभावीपणे पोहोचला असून, या उपक्रमाचे यावलकरांकडून विशेष स्वागत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.