Contact Banner

चिनावल येथील शारदा धर्मा महाजन यांचे निधन

 

chinawal-resident-sharda-dharma-mahajan-passes-away

चिनावल येथील शारदा धर्मा महाजन यांचे निधन

चिनावल प्रतिनिधी : चिनावल येथील रहिवासी गं. भा. शारदा धर्मा महाजन यांचे सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्या श्री. विद्याधर धर्मा महाजन व श्री. शेखर धर्मा महाजन यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच महाजन परिवार, नातेवाईक व आप्तेष्टांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या स्वभावातील प्रेमळपणा व आपुलकीमुळे त्या परिचितांमध्ये जिव्हाळ्याच्या होत्या.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रोझोदा रोड येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व महाजन परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.






भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.