Contact Banner

आदिवासी दिनानिमित्त नगरपालिकेत जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी स्वीकारली प्रतिमा; आदिवासी बांधवांना दिल्या शुभेच्छा

 

aadivasi-din-nagarapalike-birsa-munda-pratima-renuka-patil

आदिवासी दिनानिमित्त नगरपालिकेत जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट

नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी स्वीकारली प्रतिमा; आदिवासी बांधवांना दिल्या शुभेच्छा

सावदा : आदिवासी दिनाचे औचित्य साधून प्रथमच सावदा नगरपालिकेत आदिवासी बांधवांच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा नगरपालिकेच्या कार्यालयासाठी नगराध्यक्षा सौ. रेणुकाताई पाटील यांना भेट देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यानंतर नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे रविवार हा सुट्टीचा दिवस असतानाही आदिवासी बांधवांच्या भावनांचा विचार करून नगराध्यक्षा रेणुका पाटील स्वतः पालिकेत उपस्थित राहिल्या आणि त्यांनी जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा स्वीकारली.

यावेळी नगरसेविका रेखा वानखेडे, सिमरन वानखेडे, विशाल सोनवणे, सुनील जंगले उपस्थित होते. तर नगरसेविका कु. सिमरन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली अशरफ तडवी, नवाब तडवी यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुट्टीच्या दिवशीही नगरपालिकेत उपस्थित राहून प्रतिमा स्वीकारल्याबद्दल नगरसेविका कु. सिमरन वानखेडे यांनी नगराध्यक्षा रेणुका पाटील यांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.