Contact Banner

बोरी नदीपात्रात बुडून पारोळ्यातील ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

 

bori-river-drowning-parola-40-year-old-sunil-chaudhary-death

बोरी नदीपात्रात बुडून पारोळ्यातील ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

पारोळा : तालुक्यातील भिलाली येथील बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या पारोळा शहरातील ४० वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुनील अशोक चौधरी (वय ४०, रा. न्हावी गल्ली, पारोळा) असे मृताचे नाव आहे.

सुनील चौधरी हे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवारी त्यांना भिलाली येथे लोखंडी दरवाजा पोहोचविण्याची ट्रिप मिळाली होती. ते नितीन पाटील यांच्यासोबत वाहनाने भिलाली येथे दरवाजा पोहोचविण्यासाठी गेले होते.

काम आटोपल्यानंतर दोघेही जवळच असलेल्या बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. यावेळी नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात सुनील चौधरी वाहून गेले. त्यांचा दोन दिवस शोध घेण्यात आला.

अखेर शनिवारी सकाळी बोरी नदीवरील बंधाऱ्याजवळ पाण्यात सुनील चौधरी यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे पारोळा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.