भुसावळातील श्री र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
भुसावळातील श्री र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
भुसावळ (प्रतिनिधी): श्री र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य व विचारांवर मनोगते व्यक्त करून उपस्थितांना माहिती दिली. शिक्षक रवींद्र पाटील, सचिन चौधरी, शिरीष कोल्हे, घनश्याम फिरके आणि शीतल इंगळे यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रकार्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापिका सौ. रिता शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करून त्यानुसार आचरण करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत