Contact Banner

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश बेंडाळे यांचा सन्मान

 

bhusawals-riddhesh-anant-bendale-honoured-as-special-guest-at-independence-day-ceremony-at-red-fort-delhi


स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश बेंडाळे यांचा सन्मान


भुसावळ लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी : भुसावळ येथील रहिवासी रिद्धेश अनंत बेंडाळे यांना देशाची राजधानी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा प्रतिष्ठेचा बहुमान मिळाला. या मानाच्या सोहळ्यात त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवला.





रिद्धेश अनंत बेंडाळे हे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या बालरोग विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत बेंडाळे आणि कान-नाक-घसा विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पंकजा बेंडाळे यांचे सुपुत्र आहेत. देशाच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकताना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा मिळालेला हा बहुमान त्यांच्या कुटुंबासाठी तसेच संपूर्ण गोदावरी परिवारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.


रिद्धेश यांना मिळालेला हा सन्मान शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रिद्धेश यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन, संस्कार आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मानले जात आहे.


रिद्धेश यांनी भविष्यातही यशाची नवनवीन शिखरे गाठावीत, आपल्या कुटुंबासह संस्थेचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.