गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ.ललिता पाटील यांना ‘राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मान
गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा. डॉ. ललिता पाटील यांना ‘राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मान
लेवाजगत न्यूज, जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटी विभागाच्या सहप्राध्यापक प्रा. डॉ. ललिता पाटील यांना सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पीएच.डी. संशोधनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय नवोदय पुरस्कार-२०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तंत्रज्ञान विभागात त्यांची ‘नवोदयन ऑफ द इयर-२०२६’ म्हणून निवड झाली आहे.
यावर्षी या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देशभरातून तब्बल १४० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९५ उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. अंतिम निवड प्रक्रियेनंतर विविध क्षेत्रांतील केवळ २६ गुणवंत प्रतिभांची ‘नवोदयन ऑफ द इयर-२०२६’ या सन्मानासाठी निवड करण्यात आली. यामध्ये तंत्रज्ञान विभागातून डॉ. ललिता पाटील यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. पाटील यांनी उच्च शिक्षण, संशोधन आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या संशोधनातील सातत्य, मेहनत, गुणवत्ता आणि समर्पणाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. ललिता पाटील यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील संशोधन व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत