Contact Banner

दिपक श्रावगे यांची भाजपा सोशल मीडिया सावदा मंडळ संयोजकपदी निवड

 


दिपक श्रावगे यांची भाजपा सोशल मीडिया सावदा मंडळ संयोजकपदी निवड

सावदा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, सावदा मंडळाच्या सोशल मीडिया संयोजकपदी दिपक रमेश श्रावगे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. आ. रवींद्रजी चव्हाण, जलसंपदा व आपत्ती निवारण मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, विधानपरिषद आमदार नंदुभाऊ महाजन तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या माध्यमातून जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

या निवडीबद्दल दिपक श्रावगे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते, जिल्हा व मंडल पदाधिकारी यांचे आभार मानले. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासोबतच सोशल मीडिया माध्यमातून भाजपची ध्येयधोरणे, शासनाच्या विविध योजना तसेच विकासकामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.






दिपक श्रावगे यांच्या निवडीबद्दल सावदा भाजपा मंडळ अध्यक्ष दुर्गेश पाटील तसेच भाजपा सोशल मीडिया जळगाव (पूर्व)चे तुषार चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीचे सावदा परिसरासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत होत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.