Contact Banner

धनाजी नाना महाविद्यालयात ‘अगार आर्ट स्पर्धे’त विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला वैज्ञानिकतेची जोड

 

dhanaji-nana-mahavidyalaya-faizpur-agar-art-competition-2026

धनाजी नाना महाविद्यालयात ‘अगार आर्ट स्पर्धे’त विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला वैज्ञानिकतेची जोड

लेवाजगत न्यूज फैजपूर, दि. १० ऑगस्ट २०२६ : धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अगार आर्ट स्पर्धे’चे रंगतदार आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रातील विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक जैविक कलाकृ




ती साकारत आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच कलाकौशल्याचे दर्शन घडविले.



महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परीक्षक म्हणून सौ. स्नेहल देशमुख यांनी काम पाहिले. यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. जयंत भारंबे, प्रा. वसीम शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

स्पर्धेत तब्बल ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी गो ग्रीन, बायोफ्युएल प्रोडक्शन, अँटिबायोटिक्स विरुद्ध जिवाणू, विविध शास्त्रज्ञ, टी.एम.व्ही. विषाणू, बॅक्टेरियोफाज, सेफ्टी फर्स्ट, क्लेमीडोमोनस अशा विविध विषयांवर आधारित २२ पेक्षा अधिक आकर्षक कलाकृती सादर केल्या. या कलाकृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संबंधित विषयांचे आरोग्यदायी व वैज्ञानिक महत्त्वही स्पष्ट केले.

उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी दैनंदिन जीवनातील सूक्ष्मजीव, त्यांचे महत्त्व तसेच मानवी आरोग्याशी असलेला संबंध याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. सुवर्णा पाटील यांनी प्रास्ताविकातून सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करताना कलाकौशल्याचा प्रभावी वापर कसा करता येतो, याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमेद लोखंडे यांनी केले. कु. सादिया खान व कु. नंदिनी बखाल यांनी आभार मानले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयोगशाळा सहाय्यक महेंद्र चौधरी, प्रयोगशाळा परिचर मेघश्याम वाघोडे तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पना आणि कलाकौशल्य यांचा सुंदर मेळ साधत सादर केलेल्या कलाकृतींमुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. जिवाणू आणि सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास अधिक सर्जनशील व परिणामकारक पद्धतीने समजून घेण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरल्याचे मत भेट देणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.