नूतन आयटीआय चिनावलचा ९२ टक्के निकाल इलेक्ट्रिशियनमध्ये मयूर चौधरी, तर फिटरमध्ये नीरज सपकाळे प्रथम
नूतन आयटीआय चिनावलचा ९२ टक्के निकाल
इलेक्ट्रिशियनमध्ये मयूर चौधरी, तर फिटरमध्ये नीरज सपकाळे प्रथम
लेवाजगत न्यूज चिनावल : नूतन प्राथमिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), चिनावलचा नुकताच जाहीर झालेल्या परीक्षेचा निकाल ९२ टक्के लागला असून संस्थेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये मयूर चौधरी याने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, तर फिटर ट्रेडमध्ये नीरज सपकाळे याने ८५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित प्रात्यक्षिक सराव आणि निदेशकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळवले. उत्कृष्ट निकालामुळे संस्था, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य संदीप चौधरी म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि निदेशकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. आयटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ प्रमाणपत्र मिळत नाही, तर प्रत्यक्ष कामाचे कौशल्य आणि रोजगाराच्या संधीही मिळतात. विद्यार्थ्यांनी या कौशल्याचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. भविष्यात स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.”
पुढील काळात संस्थेचा निकाल आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणखी उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या उल्लेखनीय निकालाबद्दल अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र पालक, चेअरमन खेमचंद्र पाटील आणि सेक्रेटरी गोपाळ पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या सर्व निदेशकांचेही कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या मेहनतीसोबतच प्राचार्य व निदेशकांच्या योग्य नियोजनाला देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांना रोजगाराभिमुख बनविण्याचे कार्य नूतन आयटीआयकडून सातत्याने सुरू असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत