डॉ.केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
डॉ.केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या तथा भाजपच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
शनिवारी सकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच गोदावरी आयएमआर महाविद्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. केतकी पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके व रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, होमिओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. विद्यानंद आठवले, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, गोदावरी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश तायडे, पूनमचंद सपकाळे, आयुर्वेद महाविद्यालयाचे रजिस्ट्रार चेतन चौधरी, शिक्षण व संशोधन संचालक अशोक चौधरी, लेखापाल योगेश पाटील, सुनील बोंडे, विकास बेंडाळे, किशोर झांबरे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी मनोगत व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी एकल गीत सादर केले. तसेच डॉ. एन. एस. आर्विकर व डॉ. माया आर्विकर यांनी द्वंद्वगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संस्कृती भिरूड व डॉ. प्राची यांनी केले. कु. किवा पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमानंतर गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी डॉ. केतकी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समूह नृत्य, एकल नृत्य, गीतगायन आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बहारदार नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे कौतुक केले.
‘गोदावरी’ हा एक संस्कार अन् विचार : डॉ. केतकी पाटील
“हा माझा पहिला वाढदिवस आहे, ज्याला गोदावरी आजी नाही. गोदावरी हे केवळ एक नाव नसून तो एक संस्कार आणि विचार आहे,” असे मत डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केले.
गोदावरी हेल्थ सिटी अंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्य घडविताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. केवळ ट्रेंड म्हणून कोणताही निर्णय घेऊ नका; सकारात्मक राहून स्वतः नवा ट्रेंड निर्माण करा. पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञानही जोपासा. आपण एका नोबल पेशात काम करतो. या व्यवसायाला अनुसरून गोदावरी आजींचे संस्कार व विचार समाजापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. केतकी हे गोदावरीचे उज्ज्वल भविष्य : डॉ. उल्हास पाटील
गोदावरी फाउंडेशन अंतर्गत उभ्या राहिलेल्या संस्थांच्या मागे गोदावरी आई आणि मोठे भाऊ सुभाषदादा यांचे आशीर्वाद आहेत. आता जेन-झीची चर्चा होत आहे. त्यामुळे नेतृत्व हस्तांतरित करण्याची वेळ आली आहे. डॉ. केतकी यांचे भविष्य उज्ज्वल असून त्या मागे वळून पाहणार नाहीत, असा विश्वास डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी ‘तू मेरी जिंदगी है’ हे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत