डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
जळगाव : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने ‘शाश्वत जीवनाच्या निरोगी प्रारंभासाठी स्तनपान : प्रभावी सहाय्य व्यवस्थेला बळकटी देऊया’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पार पडला.
यावेळी डॉ. पायल पंकज सांचेती यांनी पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. साक्षी, डॉ. अथर्व, डॉ. हेतांशी, डॉ. मंजिरी आणि डॉ. प्रांशकी यांच्या सहकार्याने उपस्थित मातांना स्तनपानाचे आई व बाळाच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमात स्तनपानाची योग्य पद्धत व तंत्र, स्तनपानासंदर्भातील विविध गैरसमज व त्यामागील सत्य, तसेच स्तनपान करताना आई व बाळाला आरामदायी व योग्य स्थिती मिळण्यासाठी आवश्यक एर्गोनॉमिक्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोज सूर्यवंशी आणि डॉ. ऋतुजा गावंडे यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. उपस्थित मातांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्तनपानासंदर्भातील विविध शंका व प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करून स्तनपानाबाबत योग्य माहिती आणि जागरूकता निर्माण केली.
मातृ व बाल आरोग्य संवर्धनासाठी स्तनपानाचे महत्त्व तसेच मातांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मिळणाऱ्या सहाय्य व्यवस्थेची गरज अधोरेखित करणारा हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत