आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन; भुसावळ-वरणगाव परिसरातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक
मुक्ताईनगरात २६ ऑगस्टपासून भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह’
आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन; भुसावळ-वरणगाव परिसरातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक
लेवाजगत न्यूज वरणगाव : लोकनेते मा. श्री.विधान परिषद सदस्य एकनाथरावजी खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त (७५ व्या वाढदिवसानिमित्त) मुक्ताईनगरच्या पावन भूमीत २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह’ तसेच आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई चरित्र कथा व श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा श्री संत मुक्ताबाई मंदिर, जुनी कोथळी, मुक्ताईनगर येथे होणार आहे.
या आध्यात्मिक सोहळ्याच्या नियोजनासाठी भुसावळ व वरणगाव परिसरातील प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नियोजन बैठक भाग्यश्री लॉन, तळवेल फाटा, वरणगाव येथे पार पडली.
यावेळी प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा सांगून सोहळा यशस्वी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली.
तसेच ३० ऑगस्ट रोजी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भव्य आध्यात्मिक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
एकनाथ खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे होणाऱ्या अमृत महोत्सवाकडे राज्याचे लक्ष लागले असून विविध राजकीय पक्षांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत असल्याचे वृत्त यापूर्वीही प्रसिद्ध झाले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत