Contact Banner

आमदार नंदकिशोर महाजन यांना सिमरन वानखेडे यांचे निवेदन; सावदा-हतनूर मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीची मागणी

 

savda-hatnur-ganesh-visarjan-marg-durusti-khadyanchi-durusti-mangani

आमदार नंदकिशोर महाजन यांना सिमरन वानखेडे यांचे निवेदन; सावदा-हतनूर मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीची मागणी






लेवाजगत न्यूज सावदा : आगामी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सावद्यासह परिसरातील नागरिकांची तयारी सुरू आहे. गणेश विसर्जनासाठी सावदा ते हतनूर धरण या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

यासंदर्भात सिमरन वानखेडे यांनी विधानपरिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सावदा ते हतनूर धरण मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच हतनूर धरण परिसरात गणेश विसर्जनासाठी खाली जाताना रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे व अनावश्यक झाडांमुळे नागरिकांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही झुडपे व अनावश्यक झाडे हटवून विसर्जन मार्ग स्वच्छ, मोकळा आणि सुरक्षित करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

आमदार नंदकिशोर महाजन यांनी संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना देऊन रस्ता दुरुस्ती व विसर्जन मार्गाची साफसफाई तातडीने करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी या मार्गाची दुरुस्ती झाल्यास विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.