Contact Banner

फैजपूर येथे ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्यरात्री ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा

 

faizpur-80th-independence-day-midnight-historic-flag-hoisting-ceremony


फैजपूर येथे ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्यरात्री ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा


फैजपूर : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या १९३६ च्या ऐतिहासिक फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या भूमीवर, स्वातंत्र्य स्मारक, छत्री चौक, फैजपूर येथे गुरुवार दि. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी रात्री १०.३० वाजता एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले असून, मध्यरात्री स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करत राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे.






भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात फैजपूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. १९३६ साली याच भूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशन पार पडले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणाऱ्या अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीवर दरवर्षी मध्यरात्री ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची परंपरा जपली जात आहे.


या वर्षीचा सोहळा माजी आमदार शिरीषदादा चौधरी (रावेर) व माजी आमदार रमेशदादा चौधरी (यावल) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रभैय्या पाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड. एव्हरेस्ट राठोड, प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हारून नदवी, प्रदेश सचिव प्रवीण सरवाडे, जळगाव शहराध्यक्ष जमील शेख तसेच जळगाव ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून धनंजय चौधरी, जिल्हाध्यक्ष जळगाव ग्रामीण पूर्व; प्रशांत पाटील, ब्लॉक अध्यक्ष यावल ग्रामीण; यशवंत महाजन, ब्लॉक अध्यक्ष रावेर ग्रामीण; रियाज शेख, शहर अध्यक्ष फैजपूर; हकीम सेठ, शहर अध्यक्ष यावल आणि संग्रक्षक तायडे, शहर अध्यक्ष रावेर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


स्वातंत्र्याच्या स्मृतींना उजाळा देणे, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करणे आणि

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.