Contact Banner

ऐतिहासिक फैजपूरच्या भूमीत मध्यरात्री राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा

 

faizpur-midnight-flag-hoisting-80th-independence-day

ऐतिहासिक फैजपूरच्या भूमीत मध्यरात्री राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा

लेवाजगत न्यूज फैजपूर : सन १९३६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन ऐतिहासिक फैजपूरच्या भूमीत पार पडले होते. या ऐतिहासिक अधिवेशनामुळे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात फैजपूरचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.

याच ऐतिहासिक स्मृतींना अभिवादन करत ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १९३६ च्या अधिवेशन स्वातंत्र्य स्मारक येथे रात्री १२.०५ वाजता राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. रावेर नगरीचे माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गनवाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास जळगाव जिल्हा पूर्व काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यावल तालुक्याचे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या ऐतिहासिक सोहळ्यास जळगाव जिल्ह्यासह रावेर-यावल तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐतिहासिक स्वातंत्र्य स्मारकाच्या साक्षीने मध्यरात्री झालेल्या ध्वजारोहणामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

भारत माता की जय! 🇮🇳






वंदे मातरम्! 🇮🇳


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.