Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

godavari-engineering-college-80th-independence-day-celebration


गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांच्यासह गोदावरी फाउंडेशन अंतर्गत विविध महाविद्यालयांचे मान्यवर, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.


स्वातंत्र्य दिनानिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी ‘नवभारत निर्मिती’ आणि ‘विकसित भारत अभियान’ या विषयांवर आपले विचार मांडत नवकल्पनांचे सादरीकरण केले.





प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी ‘नया भारत’च्या संकल्पनेतील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करताना भारताला विकासशील, आत्मनिर्भर आणि सक्षम राष्ट्र बनविण्यासाठी दूरदर्शी दृष्टिकोनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आतापर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावाही त्यांनी मांडला.


यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत गोदावरी फाउंडेशन अंतर्गत विविध संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेतला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात गौरवशाली वाटचाल करीत असून नवनवीन शिखरे गाठत असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.


“स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून ‘नया भारत’ या ध्येयाच्या दिशेने एक मजबूत आणि प्रेरणादायी पाऊल आहे. २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर, विकसित आणि सशक्त राष्ट्र म्हणून उभे करणे हे आपले ध्येय आहे,” असे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या पाठीवर मिळालेल्या कौतुकाच्या थापेमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला.


यानंतर डॉ. किरण पाटील (रेडिओलॉजिस्ट) तसेच अश्विनी दीदी यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या संकल्पनेअंतर्गत ‘ॐ शांती’ मंत्राचे उच्चारण केले. त्यांनी नशामुक्त व व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमास गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासह डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल तसेच गोदावरी फाउंडेशनच्या इतर संस्थांमधील प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.