Contact Banner

जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 

jankibai-janardan-thakur-vidyalaya-guru-purnima-aware-2026

जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

आवरे | प्रतिनिधी (सचिन पाटील)

आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली.






कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. 'गु' म्हणजे अंधकार आणि 'रू' म्हणजे त्याचा नाश करणारा, अशी गुरुची व्याख्या सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील पहिले गुरु म्हणजे आई-वडील असून, त्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून योग्य दिशा देणारे शिक्षक हेच खरे मार्गदर्शक असल्याचे मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी सांगितले की, शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच जीवनातील अनेक महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार करता आले. भविष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा आणि जीवनमूल्यांचे शिक्षण गुरुजनांकडून मिळाले. गुरुंचे ऋण शब्दांत व्यक्त करणे अशक्य असले, तरी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयी आदर व्यक्त केला. गुरु हेच प्रेरणास्थान, मार्गदर्शक आणि जीवनातील दीपस्तंभ असल्याची भावना व्यक्त करत सर्वांनी गुरुजनांना शुभेच्छा अर्पण केल्या.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.