Contact Banner

सराफाच्या दुकानातून हातचलाखीने लंपास केलेले सोने जप्त; आरोपी एलसीबीच्या ताब्यात

 

सराफाच्या दुकानातून हातचलाखीने लंपास केलेले सोने जप्त; आरोपी एलसीबीच्या ताब्यात

जळगाव जिल्हा पोलिसांची प्रभावी कारवाई; ४७.४८ ग्रॅम सोने, सुमारे ४.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

local-crime-branch-arrest-gold-theft-accused-bhusawal-47-48-grams-gold-seized





लेवाजगत न्यूज फिरोज खान भुसावळ : सराफाच्या दुकानातून हातचलाखी करून सोन्याचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत त्याला अकोला शहरातून ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून तसेच त्याच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार एकूण ४७.४८ ग्रॅम वजनाचे सोने, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भुसावळ तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. १२९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) तसेच बोदवड पोलीस ठाणे गु.र.नं. १२८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) या गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने अकोला येथे रवाना झाले. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत सखोल चौकशी केली असता, त्याने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील ३२.४०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

तसेच बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली.

अशा प्रकारे या कारवाईत एकूण ४७.४८ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा, हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ. उमाकांत पाटील, पोहेकॉ. गोपाळ गव्हाळे, पोना. विकास सातदिवे, पोकॉ. प्रशांत परदेशी, पोकॉ. राहुल वानखेडे, पोहेकॉ. संदिप चव्हाण, चापोकॉ. रिजवान शेख यांचा समावेश होता. तसेच तांत्रिक मदतीसाठी पोकॉ. गौरव पाटील व पोकॉ. मिलिंद जाधव यांनी सहकार्य केले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ. विकास यशवंत बाविस्कर करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.