अत्यंत वेदनादायक व धक्कादायक बातमी; माजी सरपंच संजय दादा जमादार यांचे निधन
अत्यंत वेदनादायक व धक्कादायक बातमी; माजी सरपंच संजय दादा जमादार यांचे निधन
लोहारा, ता. रावेर : लोहारा येथील माजी सरपंच तथा काँग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष संजय दादा जमादार (वय ६० वर्षे) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लोहारा परिसरात शोककळा पसरली असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
संजय दादा जमादार यांनी गावाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने परिसराने एक सामाजिक कार्यकर्ता व लोकप्रतिनिधी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोहारा, ता. रावेर येथील राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि जमादार परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत