गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम
गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम
जळगाव : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या जळगाव, भुसावळ व सावदा येथील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये ध्वजारोहणासह देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. चंद्रया कांते, डॉ. विजय बाविस्कर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यानंद आठवले, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे डॉ. जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
खिर्डी शिवारातील कृषी हब येथे सकाळी ७.३० वाजता डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूनमचंद सपकाळे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
जळगाव-भुसावळ महामार्गावरील पी-५१ औद्योगिक वसाहतीतील गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, गोदावरी सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय, गोदावरी संगीत महाविद्यालय तसेच गोदावरी लक्ष्मी को-ऑप. बँक लि. यांच्या वतीने गोदावरी सिटी येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम सादर केले जाणार आहेत.
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. पाटील, गोदावरी सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या निलीमा चौधरी, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्सच्या डॉ. कविता देशमुख, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉ. निलीमा वारके, डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. झोपे मॅडम तसेच गोदावरी लक्ष्मी को-ऑप. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. टी. महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
भुसावळ : महेश नगर येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या परिसरात प्राचार्या अनघा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
सावदा : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदा येथेही प्राचार्या भारती महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गोदावरी फाउंडेशनच्या सर्व संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमांतून दिला जाणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत