Contact Banner

मिलिंद टोकें यांची VOM इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर कार्याध्यक्षपदी नियुक्ती

 

milind-token-appointed-as-working-president-of-vom-international-forum-maharashtra-state-executive

मिलिंद टोकें यांची VOM इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर कार्याध्यक्षपदी नियुक्ती

परभणी : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक योगदान तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत पत्रकार मिलिंद टोकें यांची व्हॉइस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के तसेच प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र ९ ऑगस्ट २०२६ रोजी परभणी येथे प्रदान करण्यात आले.

पत्रकारिता क्षेत्रातील मिलिंद टोकें यांच्या उल्लेखनीय कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक योगदानाची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पत्रकारांच्या विविध समस्या व प्रश्नांना प्रामाणिकपणे वाचा फोडणे, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविणे तसेच पत्रकारिता क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विधायक उपक्रम राबविणे, यासाठी ते कार्यरत राहणार आहेत.

पत्रकारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिलिंद टोकें यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

मिलिंद टोकें यांच्या नियुक्तीबद्दल
‘लेवा जगत’ न्यूज पेपर व परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐💐

— लेवा जगत न्यूज पेपर व परिवार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.