Contact Banner

पाटणादेवीच्या धवलतीर्थ धबधब्यात बुडून कन्नडच्या तरुणाचा मृत्यू

 

patanadevichya-dhavlatirth-dhabdhabhyat-budun-kannad-tarunacha-mrutyu

पाटणादेवीच्या धवलतीर्थ धबधब्यात बुडून कन्नडच्या तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव : पाटणादेवी परिसरातील धवलतीर्थ धबधब्यात बुडून कन्नड येथील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा संतोष गायकवाड (वय २३, रा. हिवरखेडा रोड, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.






पाटणादेवी मंदिराच्या पाठीमागील धवलतीर्थ धबधब्याच्या पाण्यात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनपाल कैलास चव्हाण व राजाराम चव्हाण (रा. पाटणादेवी) यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत केली.

ग्रामीण सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण संगिले, अकरम बेग, पोलिस नाईक भगवान माळी, दत्ताराम पवार तसेच पाटणादेवीचे पोलिस पाटील अमोल चौधरी यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याप्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.