स्वातंत्र्यदिनानिमित्त सावद्यात विठुराया आणि स्वामीनारायण मंदिरात तिरंगा शृंगार
स्वातंत्र्यदिनानिमित्त सावद्यात विठुराया आणि स्वामीनारायण मंदिरात तिरंगा शृंगार
लेवाजगत न्यूज सावदा : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सावदा शहरातील विविध मंदिरांमध्ये विशेष सजावट व आकर्षक शृंगार करण्यात आला. गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात विठुराया व रुक्मिणीमातेला भगवा, पांढरा आणि हिरवा या तिरंग्याच्या रंगांनी आकर्षक सजावट व शृंगार करण्यात आला होता. या सजावटीसाठी विठ्ठल मंदिराचे पुजारी तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
तसेच श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष तिरंगा शृंगार करण्यात आला. कोठारी स्वामी स्वयंप्रकाश दाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पुजारी सत्यप्रकाश दाजी तसेच भक्तीप्रिया दासजी श्रीजी यांनी ही आकर्षक सजावट केली. या उपक्रमासाठी हरिभक्तांनीही सहकार्य केले.
तिरंग्याच्या रंगांनी सजलेले भगवानांचे हे मनोहारी स्वरूप भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय उत्साह आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या विशेष शृंगारातून अनुभवायला मिळाला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत