सावदा पालिका इमारतीवर तिरंगी रोषणाई; स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सावदा पालिका इमारतीवर तिरंगी रोषणाई; स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज सावदा : भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त सावदा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सावदा पालिका इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तिरंगी प्रकाशझोतात पालिका इमारत उजळून निघाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली.
दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता सावदा शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष रेणुका राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्यासह सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, होमगार्ड, पोलीस कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व नागरिकांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला.
ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तंभाला नगराध्यक्ष रेणुका पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पालिका परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत