Contact Banner

मंदिराच्या संरक्षणासाठी कंपाउंड वॉलची मागणी; नगरसेविका सोनलताई महाजन व डॉ. छायाताई देशमुख यांना निवेदन

 

temple-compound-wall-demand-bhusawal-sonaltai-mahajan-chhayatai-deshmukh

मंदिराच्या संरक्षणासाठी कंपाउंड वॉलची मागणी; नगरसेविका सोनलताई महाजन व डॉ. छायाताई देशमुख यांना निवेदन






भुसावळ : शिव कॉलनी परिसरातील मंदिरासाठी कंपाउंड वॉल उभारून देण्याच्या मागणीचे निवेदन परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळाच्या वतीने नगरसेविका सोनलताई महाजन आणि नगरसेविका डॉ. छायाताई देशमुख यांना देण्यात आले.

मंदिर परिसराचे संरक्षण, सुरक्षितता तसेच स्वच्छता राखण्यासाठी कंपाउंड वॉलची आवश्यकता असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले. मंदिर परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता आणि परिसराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी कंपाउंडचे काम आवश्यक असल्याची भूमिका यावेळी महिला मंडळाच्या सदस्यांनी मांडली.

या मागणीची सकारात्मक दखल घेत, “येत्या नगरपालिका बैठकीमध्ये मंदिरासाठी कंपाउंड वॉलच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल,” असे आश्वासन नगरसेविका सोनलताई महाजन व डॉ. छायाताई देशमुख यांनी दिले.

नगरसेविकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराचा विकास, परिसराची सुरक्षितता आणि स्वच्छता यासाठी आवश्यक ते सहकार्य पुढेही मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.