सावद्यात आदिवासी दिवस उत्साहात साजरा संजरी ग्रुप, दोस्ती ग्रुप, नवाज तडवी मित्र परिवाराचा पुढाकार
सावद्यात आदिवासी दिवस उत्साहात साजरा
संजरी ग्रुप, दोस्ती ग्रुप, नवाज तडवी मित्र परिवाराचा पुढाकार
लेवाजगत न्यूज सावदा : संजरी ग्रुप, दोस्ती ग्रुप आणि नवाज तडवी मित्र परिवाराच्या वतीने सावदा येथे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी बांधवांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर शहरातून उत्साहपूर्ण मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषा, उत्साहपूर्ण वातावरण आणि सामाजिक एकतेचा संदेश देत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत