Contact Banner

सौ.विनिता भंगाळे यांना ठाणे महानगरपालिकेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

 

Ideal Teacher Award to Smt. Vinita Yuvraj Bhangale by Thane Municipal Corporation

सौ.विनिता भंगाळे यांना ठाणे महानगरपालिकेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

लेवाजगत न्यूज ठाणे -: चिनावल, ता. रावेर, जि. जळगाव येथील रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या सौ. विनिता युवराज भंगाळे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.





शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चिनावल तसेच संपूर्ण लेवा समाजाच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सौ. विनिता भंगाळे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल लेवा समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजबांधव, शिक्षणप्रेमी, आप्तेष्ट व मित्रपरिवाराकडून त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

त्यांच्या या सन्मानामुळे चिनावल गावाच्या तसेच लेवा समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.