Contact Banner

सावदा येथे राधाष्टमीनिमित्त राधादेवी जन्मोत्सव शनिवारी दुपारी १२ वाजता राधादेवी जन्मोत्सवासह भगवंतांची आरती; हरिभक्त व नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

 

Savda-Swaminarayan-Mandir-Radha-Ashtami-Radhadevi-Janmostav-Aarti

सावदा येथे राधाष्टमीनिमित्त राधादेवी जन्मोत्सव

शनिवारी दुपारी १२ वाजता राधादेवी जन्मोत्सवासह भगवंतांची आरती; हरिभक्त व नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

लेवाजगत न्यूज सावदा : येथील श्री स्वामीनारायण मंदिरात भाद्रपद शुक्ल अष्टमीनिमित्त राधाष्टमी उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मंदिरात राधादेवी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून, याच मंगलप्रसंगी भगवंतांची आरतीही करण्यात येणार आहे.

कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा भक्तिमय सोहळा पार पडणार आहे. यावेळी शास्त्री स्वामी भक्तीप्रिय दासजी, श्री श्रीजी प्रिय दासजी, भंडारी माधव स्वामी तसेच पुजारी सत्यप्रकाश दासजी सहभागी होणार आहेत.

राधाष्टमीच्या या मंगलमय प्रसंगी हरिभक्तांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राधादेवींच्या जन्मोत्सवाचा तसेच भगवंतांच्या आरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामीनारायण मंदिर ट्रस्टीतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.