Contact Banner

उपजिल्हा रुग्णालय जामनेरच्या वैद्यकीय पथकाची तत्परता; गंभीर हृदयविकाराच्या झटक्यात ७० वर्षीय वृद्धाला जीवनदान!

 


उपजिल्हा रुग्णालय जामनेरच्या वैद्यकीय पथकाची तत्परता; गंभीर हृदयविकाराच्या झटक्यात ७० वर्षीय वृद्धाला जीवनदान!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे

लेवाजगत न्युज जामनेर : छातीत तीव्र वेदना आणि प्रचंड घाम येत असलेल्या ७० वर्षीय वृद्ध रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे दाखल करण्यात आले. रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न करता उपचार सुरू केल्याने रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात यश आले.

उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. धिरल महाजन यांनी STEMI Project अंतर्गत तातडीने Serial ECG तपासणी केली. तपासणीत रुग्णाला Anterolateral MI with Atrial Fibrillation असल्याचे निदान झाले.

रुग्णाच्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘Golden Hour’मध्ये उपचार सुरू करण्यात आले. डॉ. धिरल महाजन यांनी तातडीने Streptokinase इंजेक्शन देऊन Thrombolysis उपचार केले. तसेच हृदयाचे अनियमित ठोके नियंत्रित करण्यासाठी Injection Amiodarone देण्यात आले.

या आपत्कालीन परिस्थितीत डॉ. रमेश पाटील यांनी आवश्यक इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून देत महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

Streptokinase उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न

जीवनरक्षक Streptokinase इंजेक्शन वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे औषध निर्माण अधिकारी श्री. विजयकुमार वाडेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच नाशिक सिव्हिल हॉस्पिटलचे औषध निर्माण अधिकारी श्री. कमलेश भाऊ थोरात यांच्या सहकार्यामुळे इंजेक्शन वेळेत मागवून उपलब्ध करून घेणे शक्य झाले.

जिल्हा शल्यचिकित्सकांचे मार्गदर्शन

ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये STEMI सारख्या जीवनरक्षक योजनांचा लाभ रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.

या संपूर्ण आपत्कालीन प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. उपचारानंतर रुग्णाचा रक्तदाब व हृदयाचे ठोके स्थिर करण्यात यश आले. रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले.

ही माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.