चिनावल येथे सभा मंडपाचे भूमिपूजन दिगंबर महाराज वारकरी समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
चिनावल येथे सभा मंडपाचे भूमिपूजन
दिगंबर महाराज वारकरी समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
चिनावल | प्रतिनिधी-
वै. ह. भ. प. दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा चिनावल येथील स्व. वाय. एस. पाटील सभागृहात उत्साहात पार पडली.
सभेच्या प्रारंभी जुन्या विठ्ठल मंदिरापासून वै. ह. भ. प. दिगंबर महाराज यांच्या समाधीस्थळापर्यंत टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. समाधीस्थळी आरती झाल्यानंतर आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या नियोजित सभा मंडपाचे भूमिपूजन संस्थेचे सचिव विठ्ठल भंगाळे व दुर्गादास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दुर्गादास महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले.
पंढरपूरमधील वारकऱ्यांच्या निवासाचे नियोजन
वार्षिक सभेत पंढरपूर येथे खान्देशातील वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था, संस्थेच्या आगामी वर्षातील नियोजन तसेच मागील वर्षाचा आर्थिक ताळेबंद याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नवीन सभासद वर्गणी वाढवून २ हजार १११ रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी आमदार अमोल जावळे, धनंजय चौधरी, शरद महाजन, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सरपंच ज्योती संजय भालेराव, सचिव विठ्ठल भंगाळे, सहसचिव विजय ढाके, कोषाध्यक्ष किशोर बोरोले यांच्यासह वारकरी समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत