इंदू एकनाथ चौधरी यांचे निधन
इंदू एकनाथ चौधरी यांचे निधन
लेवाजगत न्यूज फैजपूर : येथील श्रीराम कॉलनीतील रहिवासी सौ. इंदू एकनाथ चौधरी (वय ७३ वर्षे) यांचे रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता नाशिक येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम कॉलनी, फैजपूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
सौ. इंदू चौधरी यांच्या पश्चात पती, मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
त्या ना. गो. पाटील हायस्कूल, उदळीचे माजी मुख्याध्यापक श्री. इ. पी. चौधरी यांच्या पत्नी तसेच जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी. ई. चौधरी व मिलिंद चौधरी यांच्या मातोश्री होत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत